पोलीस कारवाई नंतर गुटख्याचे दाम दुप्पट

Foto


औरंगाबाद : गुन्हेशाखेच्या धडाकेबाज कारवाई नंतर शहरातील गुटखा विक्री बंद होईल असे वाटत होते .काही प्रमाणात तसे झालेही मात्र याचा  विपरीत परिणाम होऊन गुटख्याच्या किमती दुप्पट झाल्या आहेत.

मागील अनेक महिन्यापासून पोलीस दलाच्या वतीने सातत्याने गुटखा माफियावर कारवाई केली जात आहे.करोडी भागात गुन्हेशाखेच्या पथकाने दोन दिवसांपूर्वीसापळा रचून तब्बल ५६ लाखाच्या गुटख्याचा कंटेनर सहित तीन आरोपींना अटक केली होती. तर काल मध्यरात्री छापा टाकून ७ लाख रुपयांचा गुटखा पोलिसांनी जप्त केला आहे. या दोन मोठ्या कारवाई नंतर शहरातील प्रतिबंधित गुटख्याची विक्री बंद होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत होती.मात्र, प्रत्यक्षात तसे काही होताना दिसत नाही. कारवाई नंतर  शहरातिल अर्ध्यापेक्षा अधिक गुटखविक्रीची दुकाने बंद झाली आहेत हे जेवढे खरे आहे तेवढेच खरे म्हणजे आजही राजरोसपणे गुटखा विक्री होत आहे. अनेक दुकाने बंद झाल्याने टपरीचालक ग्राहकांची लूट करीत आहेत.पूर्वी मिळणारा गुटखा आज दुप्पट भावात विक्री होत आहे. पोलिसांची कारवाई सातत्याने होत असताना आता अन्न व औषध प्रशासन विभागाने देखील आता गुटखा विक्रीवर फास अवळवा अशी चर्चा आता नागरिकांत होत आहे